
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी विजय उंडे
पारनेर :- आज दि.०१जानेवारी२०२२स्वयंभू भगवान श्री हरेश्र्वर महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये कै.विष्णुशेठ पाटीलबुवा शिंदे (आप्पा)यांचा १२वा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आप्पांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली.श्री हरेश्र्वर विद्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री मधुकर बर्वे सरांनी केले तर स्वागत आहेर सरांनी केले.या कार्यक्रमासाठी नाशिक येथील सेवानिवृत्त प्राध्यापक श्री शिवाजीराव सानप यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.जीवनातील नितीमुल्ये आणि दैनंदिन जीवनातील वापर यावर सरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हरेश्र्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास शेठ शिंदे होते.या कार्यक्रमासाठी सरपंच सौ. संजीवनी आंधळे,माजी सरपंच साहेबराव वाफारे, उपसरपंच मिनीनाथ शिर्के, संस्थेचे सचिव शिवाजीराव आंधळे तसेच परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोरोना(ओमेक्रॉन)चा वाढता प्रसार पाहता कोरोनाचे सर्व नियम पाळून सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला. श्री हरेश्र्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांबळे सरांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप झाला.