
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :-देगलूर येथील कै.विठ्ठलराव संतुकराव देगावकर यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त त्यांचे चिरंजीव श्री शिवाजी वजीरे देगावकर,सुभाष वजीरे देगावकर व शरद देगावकर यांनी रोहिदास चौक परिसरातील जनतेस बसण्यास बेंचची व्यवस्था करून दिली.देगाव नाका या परिसरात देखील त्यांनी नागरिकांना बसण्यास बेंचची व्यवस्था केली आहे.असेच समाजातील लोकांच्या सेवेसाठी त्यांचे वडील जीवन व्यतिथ केले.त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या मुलांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे.या ब्रीद वाक्यप्रमाने खऱ्या अर्थाने अभिवादन व श्रद्धांजली वाहिली.त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून वजीरे परिवाराचे सर्वांनी आदर्श घ्यावा.अशी चर्चा त्या परिसरात होत आहे.यावेळी संजय दत्तात्रय जोशी(शिवसेना, उपशहर प्रमुख देगलूर),चंद्रकांत सावकार पंदिलवार,देवीदास चिंतले,संजय पाटील देगावकर,हणमंत वजीरे,गंगाधर संतुकराव वजीरे,बाबू नर्मुरके,लक्ष्मण बारडकर आदी उपस्थित होते.