
दैनिक चालु वार्ता
नवीन नांदेड सिडको प्रतिनिधी
विक्रम खांडेकर
सिडको :- येथील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भारताचे माजी गृहमंत्री” श्रद्धेय कै.डॉ. शंकरराव चव्हाण” यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आज दिनांक ६/०१/ २०२२ रोजी सकाळी १० ते २:०० वाजेपर्यंत महाविद्यालयातील सहाशे विद्यार्थ्यां पैकी ,जवळपास तीनशे विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे परिरक्षक प्रा. युसी चंदेल, प्रा.डॉ.रमेश नांदेडकर, प्रा.देशमुख सर, प्रा.कोठोळे मॅडम यांच्यासह सिडको प्राथमिक आरोग्य केंद्राचेएम.पी.डब्लू. भुरेवार, परिचारिका जयश्री दरेगावे, आशा वर्कर शितल लोखंडे,सविता कोतेपल्लू, संगणक चालक गोविंद सोनकांबळे, यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीची उपस्थिती होती.