
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- झुंजार क्रांती सेनेचे अध्यक्ष अविनाश होळगे यांच्या वतीने झुंजार क्रांती सेनेची दिनदर्शिका तयार करण्यात आली होती. या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा दक्षिण नांदेडचे आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी श्रीनिवास मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समिती सदस्य लोहा यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुदर्शन शेंबाळे नांदेड दक्षिण काँग्रेस महासचिव झुंजार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड अनिल पाटील होळगे सचिव गजानन चावरे, धनराज नावले जिल्हा संपर्कप्रमुख, कोंडीबा राजकौर नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील शिंदे नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष केशव जाधव बामणीकर कंधार तालुका उपाध्यक्ष वैजनाथ स्वामी लोहा तालुका संघटक प्रकाश कंधारे वडेपुरी सर्कल प्रमुख अजय पवार लोहा शहर अध्यक्ष दावल शेख मारोती तेलंग ग्रामीण उद्देश पेपर संपादक सरपंच कैलास गिरी. हनुमंत तेलंगे दाताळकर ओमकार कंधारे संदीप एरंडे श्रीनाथ गायकवाड वसमतकर मोहन आढाव आदिंची उपस्थिती या प्रकाशन सोहळ्यास लाभली होती.