
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
नांदेड :- आज नांदेड येथे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने भव्य अशा *जिजाऊ श्रुष्टी* ची उभारणी होत असून ,ही नांदेड वासीयांसाठी फार मोठी उपलब्धी आहे .आज त्या भूमीत जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यांनी आतापर्यंत सव्वादोन कोटी रुपयाचा निधी या कामासाठी दिला आहे . या कार्यक्रमात माजी शिक्षण मंत्री डी पी सावंत ,विधान परिषद प्रतोद व आ अमरनाथ राजूरकर, आ ओमप्रकाशजी पोकर्णा , जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर ,जिल्हापरिषद अध्यक्ष मंगाराणी आंबूलगेकर, महापौर जयश्री पावडे ,महिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ रेखा चव्हाण ,कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावनगावकर ,समाजकल्याण सभापती ऍड रामराव नाईक ,स्थायी समिती सभापती किशोर स्वामी ,आयुक्त लहाने साहेब ,संतोष देवराये तज्ञ सदस्य, शिक्षण व क्रीडा समिती जिल्हा परिषद नांदेड.मा महापौर शैलजा स्वामी ,मा उपमहापौर आनंद चव्हाण ,नगरसेवक सरिता बिरकले ,शंखतीर्थकर ,छावा चे प्रदेशाध्यक्ष पंजाब काळे या जिजाऊ श्रुष्टी च्या कामाचा धुरा सक्षमपणे पेलणारे अविनाश कदम .इ उपस्थित होते.