
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
खामगाव :- दि.12 पंचायत समिती शेगाव सभागृह हॉल येथे दि.11/1/2022 रोजी भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य व वंचित बहुजन आघाडी विशेष निमंत्रित सदस्य महाराष्ट्र राज्य समाज भूषण खामगाव रत्न मा. अशोक भाऊ सोनोने यांना प्रेस क्लबच्यावतीने खामगाव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यानिमित्ताने शेगांव येथे मा. अशोक भाऊ सोनोने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.त्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भारिप बहुजन महासंघ बुलढाणा जिल्हाध्यक्ष (माजी)तथा बुलढाणा जिल्हा परिषद सदस्य मा. राजाभाऊ भोजने वंचित बहुजन आघाडी शेगाव येथे उपस्थित होते.तसेच शहराध्यक्ष आमचे मार्गदर्शक मा राजेंद्र विश्वनाथ शेगोकार या सत्कार सोहळा प्रसंगी उपस्थित होते.
वंचित बहुजन महिला आघाडी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष्या तसेच शेगाव नगरपरिषद नगरसेविका सौ प्रितीताई राजेंद्र शेगोकार यांनी मा. अशोकभाऊ सोनाने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला भारिप बहुजन महासंघ शेगाव माजी तालुकाध्यक्ष मा श्रीकृष्ण गवई, पंचायत समिती सभापती मा. निळकंठ दादा पाटील,पंचायत समिती उपसभापती मा सुखदेव सोनोने, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.त्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम शेगाव पंचायत समिती सभागृह हॉल मध्ये संपन्न झाला.
सत्कार सोहळ्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी शेगाव शहराध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ शेगोकार, वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष तसेच शेगाव नगर परिषद नगरसेविका सौ.प्रितीताई राजेंद्र शेगोकार, वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर प्रसिद्धीप्रमुख तथा शाखाध्यक्ष अंबादास विठ्ठल सहारे,शाखा उपाध्यक्ष संघपाल वासुदेव तायडे,शाखा सचिव प्रकाश प्रभू तायडे,शाखा प्रसिद्धीप्रमुख जय नाजुकराव मोरे, शाखा सचिव विशाल मधुकर सरदार,शाखा संघटक मनोज दामा बारगड,शाखा संघटक उमेश सुदाम इंगळे,सवर्णा चिंचोली ग्रामपंचायत सरपंच गौतम इंगळे, शिरजगाव निळे ग्रामपंचायत सरपंच अनिल वाकोडे वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर प्रसिद्धीप्रमुख शैलेश भारसाकळे,विजय ईखारे,वासुदेव इंगळे सुधाकर झनके व शेगाव तालुका,शेगाव शहर, शेगाव शाखा ,सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.