
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती जव्हार अंतर्गत स्थापन केलेल्या एकता महिला धानोशी ग्राम संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व हळदी कुंकू कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.त्यानंतर उपस्थित महिलांना उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक धनंजय वायदंडे यांनी महिला सक्षमीकरण,संघटन बांधणी,महिलांचे कायदे,हक्क व अधिकार,आरोग्य,शासकीय योजना तसेच प्रभाग संघ,ग्रामसंघ,गट यांची रचना या विषयी मार्गदर्शन केले.एकता महिला ग्राम संघ यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती सर्व महिलांना देऊन वार्षिक जमा-खर्चाचे वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमात महिलांचे विविध खेळ यामध्ये संगीत खुर्ची,चमचा गोटी व हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला.महिलांनी विविध खेळांमध्ये सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळवलेल्या महिलांना बक्षिसांचे वितरण करून सदर कार्यक्रमासाठी एकता महिला ग्राम संघाचे सर्व पदाधिकारी,उमेद अभियानचे अधिकारी,समुदाय कृषी व्यवस्थापक कल्पना पारधी व महिला बचत गटातील सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते सदर कार्यक्रम हा किरोना नियमांचे पालन करून संपन्न झाला.