
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कलंबर
हनुमंत शिरामे
भोपाळवाडी :- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कै.बळीराम पाटील प्राथमिक शाळा,भोपाळवाडी ता.लोहा जि.नांदेड. या शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्याध्यापक माधव भोपाळे यांच्या हस्ते 7:30 वा.झेंडावंदन संपन्न झाले या कार्यक्रमात ध्वजाला सलामी देऊन संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन घेण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगण्यात आले.या ध्वजारोहणासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी, श्री. बालाजी पा. भोपाळे, श्री.शिवाजी पा.भोपाळे,श्री.विठ्ठलराव पा.भोपाळे, श्री.उध्दवराव भोपाळे,श्री.जीवनराव भोपाळे व श्री.बालाजीराव इंगोले गावातील दोन्ही अंगणवाडी च्या कार्यकर्ती सौ.राशिदबी शेख व सौ.सुलोचना कंदलवाडे, शाळेतील शिक्षिका श्रीमती राजश्री कंधारे ताई तसेच शाळेचे आजी-माजी विद्यार्थी मोठया उत्साहाने राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी उपस्थित होते.
वंदे मातरम्
भारत माता की जय