
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी भंडारा
राजेश गेडाम
भंडारा :- नेहरू युवा केंद्र भंडारा, युवा आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार द्वारा जिल्हा युवा संमेलन दि.२८ जानेवारी २०२२ रोजी समाज भवन, ढोलसर येथे आयोजित करण्यात आला. नेहरू युवा केंद्र भंडारा, युवा आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारा असर फाउंडेशन भंडारा ला या वर्षीचा उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार घेतांना असर फाउंडेशनचे कलावंत वैभव कोलते, दिपक तिघरे, विक्रम फडके, प्रणित उके, प्रणव आठले, शुभम पुराणिक, प्रियंका कोलते,स्नेहा तिडके, प्रणाली नंदेश्वर, स्वाती रामटेके, वनश्री बांते, दामिनी सेलोकर, तसेच असर फाउंडेशन चे बाल कलाकार पवित्रा कोलते, शौर्य तिघरे, शैलधी कोलते, शांभवी तिघरे उपस्थित होते.