
दैनिक चालु वार्ता
माकणी :- लोहारा तालुक्यातील माकणी बी एस कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे IQAC व स्पर्धा परीक्षा विभाग व युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल वेबिनार संपन्न झाला या व्यवस्थेचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक कैलास भालेकर तर प्रमुख अध्यक्ष म्हणून याचे उपप्राचार्य डॉक्टर एस .ई. मुंडे होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा ची तयारी पदवीच्या प्रथम वर्षापासून सुरुवात करावी म्हणजे पदवी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये येण्यास व स्पर्धा परीक्षेतील बारकावे समजण्यास मदत होईल.
योग्य नियोजन व वेळेत अभ्यास करण्याची सवय लावून घेतल्यास स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना अवघड जाणार नाही असे वक्तव्य माननीय श्री कैलास भालेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर प्रवीण मोरे व आभार प्राध्यापक डॉक्टर संजय बिरादार यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचारी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.