
दैनिक चालु वार्ता
मरखेल प्रतिनिधी
एकनाथ गाडीवान
येरगी :- प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतात. हा कार्यक्रम सर्व बुथ स्तरावर आयोजित करण्याच्या निर्देशानुसार देगलूर तालुक्यातील येरगी येथे ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन येरगी चे सरपंच संतोष पाटील यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या वेळी कार्यक्रमास नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रदेश कार्यकारी सदस्य तथा दिव्यांग प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, लक्ष्मण ठक्करवाड, जि.प. सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील माळेगावकर,तालुका अध्यक्ष शिवाजी कनकंटे,शहराध्यक्ष अशोक गंदपवार, अनिल पाटील खानापूरकर,प्रा.उत्तम कांबळे,शिवकुमार देवाडे जि.चिटणीस तथा मन की बात संयोजक येरगी गावचे सरपंच संतोष पाटील,ग्रा.पं.सदस्य , भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठया संख्येने कार्यक्रमास
उपस्थित होते.