
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात झुंजार क्रांती सेनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाबुराव मारोतराव मोरे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड अनिल पाटील होळगे यांनी शेतकरी , कामगार , निराधार , विविध विषयांवर चर्चा व बैठक संपन्न झाली. या बैठकीला संघटनेचे सचिव गजानन चावरे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष संतोष पाटील शिंदे हरबळकर नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष केशव जाधव बामणीकर कंधार तालुका उपाध्यक्ष वैजनाथ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कलंबर सर्कल प्रमुख पदी पंडितराव मोरे यांची निवड करण्यात आली लोहा तालुका संघटक प्रकाश कंधारे वडेपुरी संर्कल प्रमुख अजय पवार संभाजी बोकारे जगन्नाथ मामा इंगोले इत्यादी उपस्थिती होती.