
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी नांदेड
माधव गोटमवाड
नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मुगट येथील मुगट ते मुगट रेल्वे स्टेशन या मार्गावरील पशुवैद्यकीय दवाखाना हा खुप दिवसापासुन घाणीच्या साम्राज्यात विखरला होता.
त्या घाणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत होते. पशुवैद्यकीय दवाखान्यात शेतकर्यांना जनावरे नेण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत होता.
दवाखान्या समोरील मुख्य रस्त्याचाच मोठा नाला फुटुन त्यातील घाणीचा सर्व आजुबाजुच्या परिसरात उपद्रव होता. अनेक वेळेस गावकर्यांनी व शेतकर्यांनी या नाल्याला दुरुस्त करुन मार्ग सुरळीत करावा अशी मागणी निवेदनाद्वारे व ग्रामपंचायती मधील सर्व अधिकार्यांना मागणी केली.
तरी पण ग्रामपंचायतने यावर काहीच तोडगा काढला नव्हता. ग्रामपंचायतच्या या अशा दुर्लक्षामुळे थेट मनसे मुदखेड तालुकाध्यक्ष मा.बालाजी पा.कल्याणे यांनी आक्रमक भुमिका घेत ग्रामपंचायत व तालुका – जिल्हा स्तरावरील मुख्य अधिकार्यांनाच घेरा घालुन त्या नाल्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धारेवर धरले होते.
या कामाची अखेर प्रशासनाने दखल घेतली.अशी माहिती मनसे मुदखेड तालुकाध्यक्ष मा.बालाजी पा.कल्याणे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.व प्रशासनाने दखल घेतल्याबद्दल आभार मानले.