
दैनिक चालु वार्ता
प्रतीनीधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
भातागळी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेड का.आ. लोहारा यांच्या वतीने तालुक्यातील भातागळी ,मोघा खु. या ठिकाणी मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आशिष दादा पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या व्याख्यात्या रंजनाताई हासुरे संभाजी ब्रिगेड का. आ. तालुकाध्यक्ष महेश गोरे, जिजाऊ ब्रिगेड च्या प्रतिभाताई परसे, सचिव गंगाराम भोंडवे, सुशांत शिंदे, ओमकार चौगुले, शंभू वाले,आदी उपस्थीत होते .
सर्व प्रथम भातागळी येथे आशिष दादा पाटील यांच्या हस्ते फीत कापून संभाजी ब्रिगेड फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी भातागळी शाखा अध्यक्ष म्हणून धनराज जगताप उपशाखा अध्यक्ष संदेश जगताप, यांची निवड करण्यात आली तसेच मोघा खुर्द येथे जिजाऊ ब्रिगेडच्या रंजनाताई हासुरे यांच्याहस्ते संभाजी ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शाखाध्यक्ष आकाश येरनूळे यांची निवड करुन कार्यकारनी जाहीर करन्यात आली.
या प्रसगी रवी किरण जगताप विशाल फत्तेपुर ए गुंडू शिंदे काकासाहेब फत्तेपूर चंद्रकांत माने संजय गायकवाड गोपाळ सूर्यवंशी सुनील भोंडवे सूर्यकांत बोंडगे परमेश्वर गोरे मारुती माने शरद भोंडवे आनंद शिंदे हरिश्चंद्र सोनटक्के अजित मते आदी पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आशिष पाटील यांनी तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या रंजनाताई हासुरे यांनीही मनोगत व्यक्त केले संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष महेश गोरे यांनी प्रास्ताविक केले.