
दैनिक चालु वार्ता
पिंपरी शहर प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे :- कै.अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेच्या वसंतराव काळे व संभाजी राजे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अधिकारी प्रा. वैजनाथ शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष मा. रमेशभाऊ पोकळे, मा.प्रा.राजेश भुसारी, मा.अँड मंगेश पोकळे, मा.गोरख शिंदे, मा.किशोर आप्पा पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला प्राचार्य गणेश पोकळे, प्रशासकीय अधिकारी संतोष सावंत,श्री.विनोद कोल्हे, प्रा.सुरेश कसबे, प्रा सुहास गाढवे, प्रा. रुपम मुसळे, शरद पोकळे, सचिन चौरे, महेश नेवडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.