
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- भीमा कोरेगाव प्रकरणात आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी तारीख पुढे वाढवून मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चौकशी आयोगाकडे पुढच्या तारखेची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार यांनी आज सकाळी मुंबईतील चौकशी आयोगाच्या कार्यालयात हजेरी लावली. तिथे जवळपास एक तास शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात आली. याबाबत सविस्तर साक्ष नोंदवता यावी यासाठी आपल्याला या पुढची तारीख देण्यात यावी अशा प्रकारची मागणी शरद पवार यांच्याकडून आज करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.