
दैनिक चालु वार्ता
भुम तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- राज्याचे अल्पसंख्यांक कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडी कार्यालयाने कारवाई केल्यामुळे त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. गुरुवार दिनांक २४ / २ / २०२२ रोजी भारतीय जनता पार्टी तालुक्याच्यावतीने लेखी निवेदन भूम विभागीय कार्यालया मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे .यामध्ये नमूद केले आहे की राज्याचे अल्पसंख्यांक कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्या कारणाने ईंडि कार्यालयाने त्यांच्यावर कार्यवाही केली आहे. राष्ट्रहित विचारात घेतात नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे .
निवेदनावर जिल्हा सरचिटणीस आदम शेख, भाजपा नेते अगंद मुरूमकर ,पं स मा सदस्य दिलीप सानप . भाजप ता. अध्यक्ष महादेव वडेकर . ता. सरचिटणीस संतोष सुपेकर . युवा ता. अध्यक्ष भाऊसाहेब कुटे . उदयोग आघाडी ता. अध्यक्ष रमेश बगाडे . अल्पसंख्याख ता. अध्यक्ष महेबूब शेख . ता. चिटणीस बाबासाहेब विर. ता. उपाध्यक्ष लक्षमण भोरे . महिला ता. अध्यक्ष सौ. लता गोरे . शहर चिटणीस सचिन बारगजे . अ.आ.जा शहर अध्यक्ष प्रदीप साठे . अशोक बोत्रे,युवा जिल्हा सचिव गणेश भोगील . ता. उपाध्यक्ष रोहिदास भोसले,गजेंद्र धर्माधिकारी,युवा सोशल मीडिया शहर अध्यक्ष सुजित वेदपाठक आदि कार्यकर्ते उपस्थित होते .