
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी
आप्पासाहेब चव्हाण
आंबाजोगाई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी श्री. राजेश्वर(आबा) चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील साहेबांनी मान्यवरांच्या उपस्थितीत केली. मा. खा. सुप्रिया ताई सुळे, सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजयजी मुंडे, अमरसिंह जी पंडित तसेच इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना जिल्हाध्यक्ष पदासंबंधीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.
राजेश्वर आबा चव्हाण हे अंबाजोगाई तालुक्यातील हातोला गावचे भूमिपुत्र आहेत. गेली अनेक वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत आहेत. त्यांची कार्यतत्परतेमुळेच व विशेष हजरजबाबीपणा मुळेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र जी पवार यांची विशेष मर्जी संपादन केली आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व पक्षाला जिल्हयात आणखी बळकटी मिळविण्यात राजेश्वर आबा चव्हाण नक्कीच यशस्वी होतील. त्यांच्या कार्यकुशलतेवर विश्वास ठेवूनच पक्षाध्यक्षांनी त्यांच्यावर हि जबाबदारी सोपवली आहे.