
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा तालुक्यातील पेनूर येथील युवा कार्यकर्ते तथा आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांचे निकटवर्ती मारोती एजगे यांची शेकाप पुरोगामी युवकच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी आ.श्यामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे,युवानेते विक्रांत दादा शिंदे यांच्या शिफारशीनुसार मा.आ.पंडीत शेट पाटील,कार्यालयिन चिटणीस भाई राजु कोरडे,विभागीय चिटणीस भाई काकासाहेब शिंदे,पुरोगमी युवकचे राज्य चिटणीस भाई चव्हाण,शेकापचे नांदेड चिटणीस योगेश पा.नंदनवनकर,ॲड.डुमने यांनी मारोती एजगे यांची नियुक्ती केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्याची दखल घेऊन मारोती एजगे यांची निवड केली आहे. वरिष्ठांनी दिलेली जिम्मेदारी मी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरून वर्ग शेकाप पक्षाशी जोडून पक्ष मजबूत करण्याचे काम करणार असल्याचे मारोती एजगे यांनी यावेळी सांगितले. या निवडीबद्दल लोहा-कंधार मतदारसंघाचे आ.श्यामसुंदर शिंदे साहेब, सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे,युवानेते विक्रांत दादा शिंदे,जि.प.सदस्य चंद्रसेन पाटील,रोहीत पा.शिंदे,जिल्हा नियोजन समिति सदस्य बालाजी वैजाळे,सभापती ज्ञानेश्वर चोंडे,उपसभापती अरून पा कदम, उपसभापती श्याम आण्णा पवार, कंधार तालुकाध्यक्ष बाळासाहेब गर्जे,लोहा तालुकाध्यक्ष नागेश हिलाल,नांदेड तालुकाध्यक्ष गिरिश डिगोळे, कंधार युवक तालुका अध्यक्ष अवधुत पेठकर,लोहा युवक अध्यक्ष सचिन कदम,कचरू बंडेवाड,विठ्ठल कतरे,राहुल बोरगावकर,प्रसाद जाधव,अमोल गोरै,प्रणव वाले,प्रविन मंगनाळे,बंटी गाडेकर,नारायण लोखंडे, दैनिक चालु वार्ताचे कार्यकारी उपसंपादक गोविंद पवार यांनी मारोती एजगे यांचे अभिनंदन केले.