
दै चालु वार्ता
प्रतिनिधी वाई : शहरांत बेकायदेशीर देशी दारुची चोरटी वाहतूक करणारी मारुती कार व देशी दारुची ८ बॉक्स असा एकूण ८३०४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यांत वाई गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पोलिसांना यश मिळाले. याबाबत पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली असता वाई शहर ते चावडी चौक नगरपालिका जाणाऱ्या रस्त्यावरुन निळ्या रंगाची मारुती कार एमएच ०४ एवाय ४९१० मधून एक किसान बेकायदेशीर रित्या देशी दारूचे वाहतूक करीत आहे अशी माहिती श्री. भरणे यांना मिळाली असता त्यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पोलिसांना सदर गाडी बाबत शोध घेण्यांस सांगितले असता. सदर गाडी विष्णू मंदिरासमोरुन गाडी दिसल्यांने पोलिसांनी सदर गाडी थांबून चालकांस बाहेर बोलविले व त्यांस नाव व पत्ता विचारुन त्याला मारुती कार गाडीसह पोलिसांनी ताब्यांत घेऊन आरोपी विकास भास्करराव पिसाळ वय 29 रा. बावधन ता. वाई असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे . त्याच्यांवर वाई पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल केला असुन त्याच्याकडूंन देशी दारुचे ८ बॉक्स असा एकूण २३०४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यांत आला असून गुन्ह्यांचा तपास पोलीस नाईक सोनाली माने करीत आहेत . सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल , अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे वाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ शितल जानवे खराडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के , महिला पोलीस सोनाली माने आदीं पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभाग घेतला