
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी नांदेड
माधव गोटमवाड
लोहा :- लोहा तालुक्यातील रामतीर्थ येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला पैलवान म्हणून ज्याची तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात ओळख असलेले व रामतीर्थ गाव हे पैलवानाचे गाव म्हणून निर्माण करणारे पैलवान ज्ञानेश्वर देवकते यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत व शेतीवर अवलंबून असलेल्या एका शेतकऱ्याचा मुलगा व त्यांच्या वडिलांच्या शिकवणीवर लक्ष केंद्रित करून मनाशी जिद्द बाळगून आज त्यांची जिदो कुस्ती स्पर्धा नॅशनल कानपूर येथे निवड झाली. मु.पो. रामतीर्थ ता.लोहा जि .नांदेड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म.वि. राणीसावरगाव या शाळेत शिकत होता .
या शाळेतून छत्रपती शिवाजी म. कॉलेज परभणी येथे निवड झाली या शाळेत प्रथम क्रमांक मिळवला व नंतर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे नॅशनल साठी निवड करण्यात आली .या कॉलेज मध्ये 72 किलो वजनावर ची कुस्ती या कुस्ती मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. पैलवान ज्ञानेश्वर देवकते यांची नॅशनल कुस्ती साठी कानपूर येथे निवड करण्यात आली. या निवडीबद्दल गावातील सर्व मित्रपरिवार ,नातेवाईक ,सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.