
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भगवंत मान यांनी आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडले आणि पंजाबच्या विकासासाठी केंद्राकडे मदत मागितली. पंजाब विधानसभा निवडणुकीत AAP ने 117 पैकी 92 जागा जिंकल्या.
त्यानंतर भगवंत मान यांनी 16 मार्च रोजी स्वातंत्र्यसैनिकांचे गाव खटकर कलान येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज पहिल्यांदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी सीएम मान यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वी भगवंत मान यांनी ट्विट केले होते की, त्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी आणि पंजाबशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे.