
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधी
मारोती कदम
वडेपुरी :- आज दिनांक 26 मार्च 2022 रोज शनिवारी साईबाबा मंदिर कलशारोहण वर्धापन दिन साईनगर धनगर वाडी येथे संत महात्म्याच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आळंदी देवाची येथील श्री गुरु पांडुरंग महाराज घुले यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. या ठिकाणी अनेक संत महात्म्यांचा यथोचित असा आहेर देऊन सन्मान करण्यात आला. सकाळी खासदार साहेब प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब वसौ प्रतिभाताई ,प्रवीण पाटील, प्रणीताताई देवरे, ,वैशालीताई ,मायाताई, सोनालीताई,यांच्या शुभहस्ते साईबाबांची महाआरती व अभिषेक झाला. व त्यानंतर कीर्तन संपन्न झाले जिल्ह्यातील नामवंत संत महात्म्यांचा महाराज लोकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते.
हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचे सेवन केले व महाप्रसाद वाढण्याची कार्य स्वतःचा खासदार साहेब व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी केले यावेळी ह भ प बालाजी पाटील ,मारतळेकर,प्रवीण साले साहेब, संतुकरिव हंबर्डे,बळीराम पाटील जनापुरीकर ,संदीप वाघ सर, राठोड साहेब ,सुहास पाटील, साहेबराव चिखलीकर ,रंगनाथ महाराज, सुनील भाऊ मोरे , माधव पाटील सावंत, राजेश पावडे ,गंगाधर कदम, प्रकाश कदम ,यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी या कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त असंख्य कार्यकर्ते संत भाविक भक्त मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर साहेब व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी अतोनात अशी मेहनत घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम सर यांनी केले आणि हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून चिखलीकर कुटुंबीय व अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांमध्ये मेहनत घेतली व 28 मार्च रोजी साईबाबा मंदिर प्रांगणामध्ये नंदिकेश्वर यांची स्थापना होणार आहे आणि आजचा हा संत महात्म्यांच्या सत्काराचा व कलशारोहण वर्धापन दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील असंख्य साईभक्त उपस्थित होते .आणि धनगर वाडी परिसरामध्ये साईबाबाचे मंदिर म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रती शिर्डी या देवस्थानचे रूप आले आहे असे आपणास दिसून येते अतिशय भव्य दिव्य मंदिर मंदिराचा परिसर बघुन प आणि परिसरामध्ये असे महान अन्नदानाचे, कीर्तनाचे कार्यक्रम म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्याची जिल्ह्याचे भाग्य उदयाला आलेआहे असे हा कार्यक्रम पाहून सर्वांनाच वाटत होते. खरोखरच साई मंदिर परिसरामध्ये साक्षात साईबाबा अवतरल्यासारखे प्रसन्न वाटतं होते.