
दैनिक चालु वार्ता
उस्मानाबाद प्रतिनिधि
नवनाथ यादव
उस्मानाबाद :- दि.15 एप्रिल 2022 रोजी, युगप्रवर्तक बहुउद्देशिय सामाजिक फाउंडेशन, उस्मानाबाद आयोजित महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा,अस्मिता कांबळे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृह उस्मानाबाद येथे दुपारी 12.30 वाजता,संपन्न झाला. या बाबत सविस्तर वृत्त असे की,युगप्रवर्तक बहुउद्देशीय सामाजिक फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
याप्रसंगी जि.प.च्या माजी अध्यक्षा,अस्मिता कांबळे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले योगदान हे किती अमूल्य आहे. हे समजून घेण्यासाठी बाबासाहेब वाचले पाहिजे.संविधानात केलेल्या तरतुदी या महिलांसाठी किती उपयुक्त आहेत.याची जाणीव बुद्धिजीवी महिला वर्गाने इतर महिलांना सामान्य कष्टकरी महिलांना गृहिणीला करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले पाहिजे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा-अठरा तास अभ्यास करून आपल्या समाजाला एक दिशा देण्याचे काम केले आहे.
तो अभ्यास किती महत्त्वाचा आहे.याची जाणिव आपल्या पाल्यांना,विद्यार्थ्यांना करून देण्याची सर्वाधिक जबाबदारी ही महिला वर्गावर असून त्यांनी ती पार पाडली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष त्रिशला गवळी मॅडम होत्या.राज्यभरातून 200 पेक्षा जास्त निबंध प्राप्त झाले होते. त्याचे योग्य परीक्षण करून प्रथम क्र. संगिता सूर्यकांत घुगे अणदूर, द्वितीय क्र. रोशनी भिकन निकम रा.चोपडा जि.जळगाव व तृतीय क्र.अस्मिता लहू मेंढे सांजा जि. उस्मानाबाद यांना अनुक्रमे 5131 रूपये,3131रूपये व 2131रुपये यासह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपञ देण्यात आली.सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.राजा जगताप, प्रा.सूर्यकांत गायकवाड,बीड प्रा.बी.एस.सूर्यवंशी, प्रा.विनायकुमार सोनवणे राययड, ऍड.अश्विनी सोनटक्के, जगदीश जाकते व सुकेशनी वाघमारे हे उपस्थित होते,तर सर्व प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित सर्व स्पर्धकांना यथोचित मार्गदर्शन केले.बक्षीस वितरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सतिश ढोणे, त्रिशला गवळी, सिद्राम साखरे, विठ्ठल जेटीथोर, शेखु जेटीथोर,रामदास गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, अनंत कानेगावकर, संजय भंडारे, जगदीश जाकते,सुरेश भालेराव, चंद्रकांत मस्के,मिलिंद जानराव,गौतम रणदिवे शिवाजी साखरे इत्यादींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामल ताकपिरे यांनी केले व आभार प्रदर्शन चंद्रकांत मस्के यांनी केले.