
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- आयपीलएल 2022 च्या 28व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि हैदराबाद सनरायझर्स एकमेकांशी भिडले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघानं सात विकेट्स राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. हा त्यांचा या हंगामातील सलग चौथा विजय होता. तर, या सामन्यात महत्वाची भूमिका बजावणारा हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात पंजाबसाठी लियाम लिव्हिंगस्टोनने शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याच वेळी तो पंचांशी वाद देखील घालताना दिसून आला. यामागचं कारण समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं?
हैदराबाद विरुद्ध पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोननं एकाकी झुंज दिली. दरम्यान, पंजाबच्या डावात बाराव्या षटकात हैदाराबादकडून उमरान मलिक गोलंदाजी करण्यासाठी आला. उमरान मलिकनं या षटकातील चौथा चेंडू 149 च्या वेगानं टाकला. या चेंडूवर लिव्हिंगस्टोननं पूल खेळण्याचा प्रयत्न केला. पण, तो अपयशी ठरला. हा चेंडू पंच वाईड बॉल ठरवतील, असं लिव्हिंगस्टोनला वाटलं. पण, पंचांनी हा चेंडू वैध ठरवत फक्त वन बाऊन्सचा इशारा दिला. ज्यानंतर लियान लिव्हिंगस्टोननं पंचाशी वाद घातल्याचं पाहायला मिळालं आहे.
हैदराबादचा पंजाबवर तीन विकेट्स राखून विजय या सामन्यात हैदराबादच्या संघान नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात प्रथम फलंदाजी करण्याठी आलेल्या पंजाबच्या संघानं 20 षटकात 10 विकेट्स गमावून 151 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघानं तीन विकेट्स राखून विजय मिळवला आहे.