
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कवी सरकार इंगळी
हुपरी :- हुपरी ता हातकणंगले येथे दिं २४ एप्रिल २०२२रोजी कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित ११व्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात विविध साहित्यिकांना स्व.विष्णू रामचंद्र कुराडे, स्व,विठाबाई कुराडे, स्व. लक्ष्मी सुरेश कुराडे. याचे स्मृर्तीप्रिर्थ मा .प्राचार्य.डाॅ. सुरेश विष्णू कुराडे पुरस्कृत साहित्य दर्पण राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार मा.लेखक मनोहर भोसले सैनिक टाकळी यांच्या हराकी या कादंबरीस जाहीर करण्यात आला आहे. तसेच धरणगुत्ती येथील सेंट्रीग कॉंटेक्टर मा पिंटू सदाशिव वराळे यांना जाहीर करणेत आला आहे.. तर मा,प्रा,डाॅ सुरेश कुराडे ,कवी सरकार इंगळी व कवी सिराज शिकलगार आंदळी यांना गौरवपत्र देऊन सन्मान करणेत येणार आहे.अशी माहिती कवी सरकार इंगळी यांनी दिली.