
दैनिक चालु वार्ता
नवी दिल्ली :- जागतिक घडामोडी आणि सरकारच्या कर आकारणीमुळं देशात महागाई वाढते. गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढताना दिसत आहे. केंद्र सरकारला वाढत्या महागाईवरून प्रचंड मोठ्या विरोधाचा सामना देखील करावा लागत आहे. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे.
अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे एका कार्यक्रमात बोलत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, देशात महागाईचा स्तर फार पुढे गेलेला नाही. सध्या महागाईचा निर्देशांक हा 6.95 टक्क्यांवर आहे. मात्र याचा टॉलरन्स बॅण्ड हा केवळ चार टक्के अधिक किंवा दोन टक्के कमी इतका आहे, असं वक्तव्य केलं आहे. यावर राष्ट्रवादीकडून टीका करण्यात आली आहे. महागाई वाढत असताना अर्थमंत्री ऑल इज वेल म्हणत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली.