
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- जल हेच जीवन जल हे तो कल है या म्हणीप्रमाणे मराठवाड्यात अग्रेसर असलेल्या लोहा न.पा. च्या वतीने पक्षासाठी ही पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असुन सुर्य आग ओकतोय तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मानवा प्रमाणे पशू पक्षी वृक्ष या सर्व सजीव सृष्टीला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे पाणी जसे मानवासाठी जीवन आवश्यक आहे तसेच पशू पक्षी व वृक्ष यांच्यासाठी ही जीवन आवश्यक आहे. लोहा न.पा.ही नागरिकांना स्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अग्रेसर आहे. तसेच ज्या प्रमाणे सम्राट अशोक,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी त्यावेळी त्यांच्या राज्यात नागरिकां बरोबरच पशू पक्षी यांना ही पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.
तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोहा न.पा च्या लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली लोहा न.पा. च्या वतीने लोहा येथील जनावरांच्या बाजारात चार हौदा द्वारे गाय म्हैस बैल शेळी मेंढी आदी पशूंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच आता लोहा शहरात पक्षासाठी पिण्याच्या पाण्याची सोय लोहा न.पा. चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी लोहा न.पा. च्या प्रगणांत केली आहे यावेळी लोहा न.पा.चे गटनेते करीम भाई शेख, नगरसेवक नबी शेख आदी उपस्थित होते. लोहा न.पा. च्या वतीने पक्षांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून २०० ठिकाणी झाडावर पक्षासाठी पाणपोई सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.