
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- आज दि : २३/०४/२०२२ रोजी अंबेजोगाई-लातूरअंबेजोगाई महामार्गावर नंदगोपाल डेअरी जवळ आज
सकाळी १० वाजताच्या सुमारास ट्रक आणि क्रूझरच्या भिषण अपघातात सात जन ठार तर १० जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृति चिंताजनक आहे. अरूण महामार्गामुळे बर्दापूर ते आंबसाखर टप्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढते असून प्रवसांचे नाहक बळी जात आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे आज मवंध्यच्या कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लातुर जिल्ह्यातील साई आणि आर्वी येथून नातेवाईक क्रुझर निघाले होते.
ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांचा क्रूझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात सात जण ठार झाले तर १० जण जखमी झाले आहेत. मृतामधील निर्मला सॊमवंशी (३८),स्वती बोडके(३५), शकुंतला सॊमवंशी(३८), सोजाराबाई कदम (३७), चित्रा शिंदे (३५), खंडू रोहित(३५ चालक), अनोळखी एकाच्या समावेश आहे.तर, राजमती सोमवंशी(५०), सोनाली सोमवंशी(२५), रंजना माने (३५), परिमाला सोमवंशी(७०), दत्तात्रय पवार(४०), शिवजी पवार(४५), यश बोडके(०९), श्रुतिका पावर(०६), गुलाबराव सोमवंशी(५०), आणि कमल जाधव(३०), हे दहा जण जखमी झाले आहेत. जखमीपैखी तिघांची प्रकृति चिंताजनक आहेत. मृतात महिला अणि बालकांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक खंडू गोरे, रणजित लोमटे, तानाजी देशमुख यांनी रुग्णालयात धाव घेतली. पालकमंत्री मुंडे मोबाईलवरून संपर्कात राहून सातत्याने अपडेट घेत होते.
दरम्यान अंबेजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कवीता नेरकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाय यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपुस केली.
अरुंद रस्ता बनला मृत्यूचा सापळा
लातूरहून आलेल्या चौपडरी महामार्ग बर्दापुरच्या पुढे दुपदरी होऊन अरुंद होतो.त्यामुळे अत्यंत वरदळीचा असलेल्या बर्दापूर ते आंबसाखर दरम्यान सतत अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. आंबसाखर येथील सभेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी रस्ता चौपदरी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कालौघात हे आश्वासन हवेत विसरले असून निष्पाप नागरिकांचा बळी जणांच्या घटना सुरूच आहेत. किमान तातडीने या टप्यात गतिरोधक तरी टाकावेत अशी मागणी होत आहे.