दैनिक चालू वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी
आप्पासाहेब चव्हाण
अंबाजोगाई येथील स्वा रा ती रुग्णालयाचे कामगार ऑनलाइन पद्धतीने चालते परंतु नेटवर्क मिळत नसल्याने नेट बंद पडले आहे .यामुळे हे कामकाज शनिवारी दिनांक 16 सकाळी दहा वाजल्यापासून बंद पडल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे .वारंवार नेटवर्कची समस्या येत असल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शनिवारी सकाळी रुग्णालयात आलेल्या लोकांना नेटवर्क बंद असल्याने कोणतेही पेपर मिळत नव्हते .सकाळी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना ओपीडी पेपर मिळाला नसल्याने अनेक वेळा त्यांना आणि ताटकळत बसावे लागत आहे जन्म-मृत्यूची नोंद व इतर कागदपत्रे नेटवर्क बंद असल्याने मिळणे बंद झाले आहे नेटवर्क नसल्याने कर्मचारी आपल्या खुर्चीत नव्हते.