
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
पिंपळदरी :- ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती निमित्त गावातील नागरीक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच श्री. संतोष पाटील जाधव यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच शंकर कटवड ( उपसरपंच) यांच्या हस्ते श्रीफळ फोडून, कार्यक्रमाची सुरुवात झाली. जमलेल्या सर्व नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी उपस्थित कोंडीबा पाटील (ग्रा.सदस्य) आनंद पा., गोविंद पा. , माधव पा., मारुती पा.नजीर शेख,सोनाजी कांबळे (अध्यक्ष जयंती मंडळ) देवराव कांबळे, शिवाजी कांबळे, गोपाळ कांबळे, माधव कांबळे, संजय कांबळे, चांदु कांबळे, नितीन कांबळे, , स्वप्नील कांबळे, अनिल कांबळे, सतिश कांबळे, प्रभाकर कांबळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कांबळे यांनी केले. ग्रामपंचायत कार्यालय पिंपळदरी यांच्या वतीने जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.