
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
नांदेड :- प्रत्यक्ष जमीन कसणारा म्हणजे शेतकरी होय. शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते. रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतात. कंधार तालुक्यातील सततच्या नापिकीमुळे, कर्ज कसे फेडावे या विवंचनेने, पावसाच्या लहरीपणामुळे, गेल्या काही वर्षापासून त्यांना अपेक्षित उत्पादन होत नव्हते, त्यातच वाढता कर्जाचा डोंगर, कर्ज कसे फेडावे याची चिंता अश्या वेगवेगळ्या कारणाने दोन वर्षांमध्ये कंधार तालुक्यांतील 29 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजार भावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इत्यादी कडून घेतलेले कर्ज, परत फेडण्याची मुदत संपणे, मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज, शिक्षणासाठी घेतलेले कर्ज त्यातच अचानक येणाऱ्या संकटाचा सामना करावा लागतो. हवामानात अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतातील पिकाचे नुकसान हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो व शेतमाल विकण्याची वेळ आली की भाव कमी होतो. अश्या अनेक कारणाने तालुक्यांतील शेतकऱ्याने आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली.
यामध्ये गोविंद मसनाजी तुडमे रुई, लक्ष्मण आनंदा वने खुड्याचीवाडी, प्रभाकर गोविंद लाडेकर घोडज, प्रकाश मोतीराम सोनकांबळे कल्लाळी, चंद्रशेखर शंकरराव कुंभारगावे बहाद्दरपुरा, विलास नामदेव मोरे पानशेवडी, संभाजी सटवा गायकवाड कळका, हरिबा निवृती वळशिंगे मोहिजापरांडा, विजयसागर गोविंद मरशिवणे मोहजा परांडा, मनोहर माधव गुट्टे गुट्टेवाडी, ग्यानोबा सटवा सोनकांबळे रुई, संजय नागनाथ कतुरे नागलगाव, गोविंद व्यंकटी कदम मंगलसांगवी, केशव किशन डांगे गंगनबीड, शिवाजी श्रीराम वाखरडे बारुळ, कोंडीबा ग्यानोबा इंगळे शिराढोण, माधव श्रीरंग केंद्रे उमरगा, शंकर रामराव वाघमारे शेकापुर, संभाजी विठ्ठल जिंके इमामवाडी, गणेश प्रल्हाद राठोड तळ्याचीवाडी, सदाशिव मारोती कराड शेल्लाळी, दिगंबर तुळशीराम मुंडकर गुंटूर, निळकंठ शिवाजी जाधव वहाद, शिवराज संतुका बोईनवाड पेठवडज, प्रल्हाद नागोराव लामदाडे भुत्याचीवाडी, उत्तम आईनाथ कल्याणकर गोगदरी, किशोर वामन भुते भूत्याचीवाडी, धम्मानंद बळीराम सोनकांबळे दिग्रस खुर्द.
यामध्ये 20 शेतकऱ्यानी गळफास, 7 शेतकऱ्यानी विषारी औषध प्रशासन केले, 2 शेतकऱ्यानी नदी, विहिरीमध्ये उडी मारुन आपली जीवनयात्रा संपविली. शासनाकडून आर्थिक मोबदल्यासाठी पात्र शेतकरी 21, अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकरी 8. पण काही शेतकऱ्याना पात्र होऊन ही आणखी काहीच मोबदला मिळाला नाही. मात्र दुर्दैवाने जगाला जगवणारा हा शेतकरी राजा कायम संकटात असतो कधी निसर्गाची अवकृपा तर कधी शासनाचे उदासीन धोरण.