
दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
अटारी पुणे :- झोन- VIII, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियान” निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, धुळे येथे दि. २६ एप्रिल, २०२२ रोजी करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी.डॉ. चिंतामणी देवकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, धुळे, प्रमुख पाहुणे, श्री.मनोज दास,जिल्हा प्रबंधक, अग्रणी बँक,धुळे, श्री.विवेक पाटील,जिल्हा प्रबंधक,नाबार्ड,धुळे, श्री.सुनीलकुमार राठी,प्रकल्प उपसंचालक, आत्मा,धुळे, श्री.शांताराम मालपुरे, उपविभागीय कृषि अधिकारी,धुळे, डॉ. मिलिंद भंगे, सहा. उपयुक्त, पशुसंवर्धन विभाग,डॉ.दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, धुळे, श्री.भदाणे,प्रकल्प अधिकारी माविम,धुळे, श्री.दिलीप पाटील,अध्यक्ष,शेतकरी शास्त्रज्ञ मंच, श्री.हितेंद्र गिरासे,उपाअध्यक्ष, शेतकरी शास्त्रज्ञ मंच, श्री.श्रीधर देसले,सहायक प्राध्यापक,उद्यान विद्या,कृमवी,धुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्याचे प्रास्ताविक डॉ. दिनेश नांद्रे यांनी केले, प्रास्तविका मध्ये त्यांनी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियान कार्यक्रमाचा उद्देश, महत्व उपस्थितांना अवगत करून दिले.तसेच शेतकरी शास्त्रज्ञ सुसावंदाचे महत्व अधोरेखित करून कृषि विज्ञान केंद्र राबवीत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती देत, यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन शाश्वत उत्पादनाकडे वाटचाल करावी असे आव्हान केले. राष्ट्रीयता स्तरावर मा. नरेंद्रसिंग तोमर,केंद्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री, भारत सरकार यांनी आभासी पटला द्वारे किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियानाचे उद्घाटन केले.
श्री.शांताराम मालपुरे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना विषयी माहिती उपस्थित शेतकरी, महिला वर्गाला करून दिली.श्री. सुनीलकुमार राठी यांनी स्मार्ट प्रकल्पा विषयी माहिती देत, आत्मा कार्यालया मार्फत राबवीत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली. यासोबतच डॉ.मिलिंद भंगे, यांनी पशुसवर्धन विभागाच्या विविध योजने विषयी माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री.मनोज दास व श्री. विवेक पाटील यांनी बँक अंतर्गत योजने विषयी माहिती उपस्थितांना अवगत करून दिली. अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डॉ.चिंतामणी देवकर यांनी शेतीमधील बदल स्वीकारत उत्पादन खर्च कामी करून उत्पन्न वाढ कसे करता येईल या कडे लक्ष देणे गरजेचे त्यासोबतच जमिनीचा पोत चांगला ठेवण्या करीत्या टप्प्याटप्प्या सेंद्रिय शेती उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करावे लागेल या करिता महात्मा फुले कृषि विद्यापीठ राबवीत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
तसेच शेती सोबत शेतकऱ्यांनी उत्पन्न दुप्पट करण्याकरिता कृषि व कृषि पूरक प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे, त्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी, शेतकरी, महिला आदी यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान केले. सदर शेतकरी मेळाव्यात महाराष्ट्र शासन, कृषि विभाग पुरस्कार प्राप्त धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन्मान चिन्ह देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यामध्ये श्री.शरद पवार,पढावद,शिंदखेडा, श्री. वाल्मिक पाटील, चांदे,धुळे, श्री.कुमारसिंग पावरा,न्यू बोऱ्हाडी, शिरपूर आणि डॉ.नरेंद्र भदाणे,सामोडे,साक्री यांचा समावेश होता. तसेचे कृषि विज्ञान केंद्रा मार्फत विविध कृषि प्रक्रिया युक्त पदार्थांचे व विविध कृषि माहिती पुस्तिका, घाडीपात्रीकेंचे प्रदर्शन दालन लावण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये धुळे जिल्ह्यातील महिला बचत गटाचे सदस्य, FPO चे सदस्य, शेतकऱ्यांनी मोठ्या संखेने सहभाग नोंदवला.
या मेळाव्याचे संपूर्ण संचालन डॉ.धनराज चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अतिश पाटील, यांनी मानले. शेतकरी मेळावा यशस्विते शेतकरी मेळावा यशस्विते साठी डॉ.पंकज पाटील, श्री. जगदीश काथेपुरी, श्री.रोहित कडू, श्रीमती. अमृता राऊत, श्री.जयराम गावित, कु.प्राची काळे, कु. स्वप्नाली कौटे, श्री.स्वप्नील महाजन, श्री. रमेश शिंदे, श्री.कुमार भोये, श्री. मधुसूदन अहिरे, कृषि विभाग, आत्मा कार्यालाचे अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.