दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- २०२२ मध्ये पक्की अनुज्ञप्ती साठी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पक्क्या अनुज्ञप्ती (लायसेंस) च्या चाचणीसाठी ४ आणि ५ मे रोजी खेड, १० आणि ११ मे रोजी मंचर, १७ आणि १८ मे रोजी जुन्नर, २४ आणि २५ मार्च रोजी वडगाव मावळ आणि ३० मे रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्ती (लायसेंस ) साठी २ मे २०२२ रोजी सायं. ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे. तरी गरजू नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे प्रशासनाने कळविले आहे.