दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर
पुणे:-
समाजविकास विभागाच्या नावाखाली नगरसेवकांकडून शहराच्या वेगवेगळ्या भागांत वॉर्डस्तरीय निधी खर्च करून तब्बल 18 छोटी सभागृहे उभारली आहेत. मात्र, त्यांचा वापर होत नसल्याने हे सभागृह महापालिका आता भाडेकराराने देणार आहे. शहरातील शासकीय कार्यालयांना या जागा देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सुमारे ५ हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या आकाराचे हे सर्व सभागृह असल्याची माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाने दिली.
महापालिकेकडून शहरातील मिळकतींची माहिती संकलीत करण्यात येत आहे. महापालिकेवर प्रशासक येण्यापूर्वी शहरात नगरसेवकांच्या ताब्यात अशा मिळकती होत्या, अथवा त्याबाबत प्रशासनास निर्णय होताना या मिळकती आपल्याच संस्थेला देण्यासाठी त्यांचा आग्रह असायचा. त्यामुळे वर्षानुवर्षे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या मिळकती पडून त्याच्यातून कोणतेही उत्पन्न महापालिकेस मिळत नाही. या उलट काहीही वापर नसताना देखभालीच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपयांचा निष्कारण खर्च होत असे. आता नवीन उत्पन्न वाढेल.