दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता. प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर-एका प्रकरणात मदत करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवलंदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली .राजेंद्र गोरख लामतुरे असे अटक केलेल्या पोलिसांचे नाव आहे .
लामतुरे हे औसा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत .औसा पोलिसात भादवी २९४,३२३,५०६ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार लामतुरे यांनी तक्रारदारास पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ताडजोडीअंती पहिला हप्ता तीन हजार तर दुसरा हप्ता दोन हजार अशी लाच मागितली.
शुक्रवारी पाच वाजण्याच्या सुमारास लामतुरे यांनी तक्रारदार यांना पैसे घेऊन रहरलेल्या ठिकाणी बोलावले होते.
तक्रारदार यांना लाच घ्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. त्यानुसार सापळा रचून एसीबीच्या पथकाने तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लामतुरे यांना रंगेहात पकडले .पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने ही कार्यवाही केली आहे .पुढील तपास अन्वर मुजावर करीत आहेत.