दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
गेवराई- गेवराई न्यायालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य वाढत चालले असून परिसरात स्वच्छता करण्यात यावी तसेच नविन इमारतीत न्यायालय कार्यान्वित करावे अशा विविध मागण्यासाठी सलग सहाव्या दिवशी ही वकील संघाचे तालुकाध्यक्ष अॅड. अमित मुळे यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरील आंदोलन सुरूच आसून आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नसाल्याचे अध्यक्ष अॅड. मुळे यांनी सांगितले.