दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्तरावर गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुका वर्षाखेरीस होणार आहेत.
जयपूरमध्ये भाजपाच्या देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा पदाधिकाऱ्यांना पुढील २५ वर्षांच्या दृष्टीने पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
या महिन्यातच भाजपा आघाडीचं सरकार येण्याला ८ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘या महिन्यात भाजपाला केंद्रात ८ वर्ष पूर्ण झाले आहेत. ही वर्ष देशाची सेवा करण्याची, गरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची होती. तरी आपल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रउभारणीच्या कामात स्वतःला झोकून देऊन काम केलं आहे.”