लोहा वासियांच्या सत्कारांने भरावलो लोहा हे माझे घरच — प्रा.डाॅ. भाई पुरुषोत्तम धोंडगे
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहयात श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष मा. जि.प. सदस्य प्रा.डाॅ. भाई पुरुषोत्तम धोंडगे यांचे हळदवचे मा. सरपंच श्री हरी पाटील शिंदे यांच्या वतीने दि.२७ हे रोजी रात्री ८वाजता प्रिन्स अॅप्टीकच्या समोर एका शानदार कार्यक्रमात अभिष्टचिंतन करण्यात आले.
कंधार -लोहा मतदार संघाचे माजी आमदार भाई डॉ. केशवराव धोंडगे यांचे कर्तव्यदक्ष कनिष्ठ सुपुत्र असलेले भाई प्रा.डाॅ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय व आरोग्य विषयक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले कोरोना काळात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत भाऊचा डब्बा उपक्रम राबविला अनेक डॉक्टरांना मोफत किट वाटप केले माजी आमदार भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्तर जन्म शताब्दी महोत्सव कार्यक्रम अंतर्गत शलेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करणे, श्री संत गाडगे महाराज विद्यालयाच्या नुतन विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे गोरगरीबांना मदत करणे आदी सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
लोहा -कंधार ची जनता भाई पुरुषोत्तम धोंडगे यांना भावी आमदार म्हणून पाहत आहेत या लाडक्या युवा नेत्यांचा दि. २७ मे रोजी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसानिमित्त लोहयात अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला शहरात अनेक बॅनर लावण्यात आले होते.
यात हळदवचे मा. सरपंच हरी पाटील शिंदे यांनी आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याने संपुर्ण लोहा वासियांचे लक्ष वेधून घेतले.
हरी पाटील शिंदे यांनी प्रा. डॉ. भाई पुरुषोत्तम धोंडगे यांचा भव्य दिव्य गुलाब व पुदिना यांचा ३० फुटांचा पुष्पहार आणून किरणच्या साह्याने भाई पुरुषोत्तम धोंडगे यांच्या गळ्यात घालून ढोल ताशे वाढवून फटाक्यांची भव्य जोरदार आतिषबाजी करून भव्य सत्कार करुन केक कापून वाढदिवस साजरा केला. तसेच लोहा शहरांच्या परंपरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून ही सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव, छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, नगरसेवक केतन खिल्लारे, माजी नगरसेवक पंकज परिहार, अनिल दाढेल ,शरफोदीन शेख, गब्बु राठोड, विनोद शिंदे, बालाजी चव्हाण, नागनाथ चुडावकर, यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. भाई पुरुषोत्तम धोंडगे म्हणाले की मागील दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळे वाढदिवस साजरा केला नाही. यंदा हरी पाटील शिंदे हे कंधार ला घराकडे आले व म्हणाले भाऊ या वर्षी वाढदिवस साजरा करुत तुम्ही येथे माझा सत्कार केला तुमच्या सत्कारांने मी भरावून गेलो तुमच्या सत्कारांचे ओझे माझ्या अंगावर आहे. आज लोहा येथे माझा सत्कार झाला त्यामुळे लोहा हे माझे घरच आहे असे वाटते .
माजी आ.भाई केशवराव धोंडगे यांनी दाखविलेल्या मार्गावर चालुन गोरगरीबांची सेवा करु तसेच या अगोदर सोनू संगेवार यांनी त्यांच्या भाषणात माझा उल्लेख भावी आमदार म्हणून केला त्याला योग्य वेळ आल्यावर ते ही होईल प्रकृती चांगली असली पाहिजे .
हरी पाटील शिंदे तुम्ही जे माझा सत्कार करून माझ्या गळ्यात टाकला तो घरापर्यंत गेला पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे असे प्रा.डाॅ. भाई पुरुषोत्तम धोंडगे म्हणाले.