दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : पंजाब मध्ये भांगडा, गुजरातेत गरब्याला जितकं महत्त्व आहे, तसचं महत्त्व पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ढोलताशा वादनाला आहे. ढोलताशा खेळाला महाराष्ट्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ढोलताशा खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा द्यावा अशी मागणी पुण्याचे खासदार गिरीष बापट यांनी केली आहे. त्यांनी या विषयाचे पत्र केंद्रीय युवक आणि क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांना दिले. या पत्रात बापट पुढे लिहीतात कि, प्राचीन काळापासून ढोलताशा खेळाला अनेक ठिकाणी पूजनीय व शुभ मानले गेले आहे. ढोलताशा ही महाराष्ट्राची संस्कृती व शान असून ही ओळख फक्त महाराष्ट्रापुरती नसून आता गुजरात, गोवा, सिल्व्हासा, आंध्रप्रदेशातही या खेळाचा विस्तार झाला आहे. एवढेच नव्हे तर परदेशातही काही ठिकाणी गणेशोत्सव, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांत सुध्दा तेथील महाराष्ट्रीय कुटुंबे ढोलताशा खेळाला प्राधान्य देतात. म्हणून ढोलताशा या खेळाला “राष्ट्रीय खेळ” म्हणून त्वरित मान्यता देण्यात यावी ही विनंती.