दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी: मंथन फाउंडेशन व रिलीफ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आधार कार्डचे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यांना पोस्टाचे बचत खाते उघडण्यात आले.सुमारे (१५५) महिलांनी याचा लाभ घेतला.
मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी दैनिक चालु वार्ता शी बोलताना सांगितले की वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी संस्था आधार कार्ड सोबतच रेशन कार्ड काढणे, मतदान ओळखपत्र बचत खाते उघडणे व संजय गांधी निराधार योजना अनुदानसाठी संस्था मदत करते.
यावेळी मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट, रिलीफ फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल बोरकर, संस्थेचे कार्यकर्ते वृषाली गोरे, श्रीराम देशपांडे, आरती गणुरे, गणेश खेडेकर, मेरी डिसोझा, वैशाली ओव्हाळ, आरती आंग्रे, मोनिका कांबळे, डॉ. अभिजीत कांबळे, डॉ. चेतन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.