नागेश मधुकर तुरुकमाने असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव
औरंगाबादमधील फायनान्स कंपनीत करत होता काम._
शहरातील भावसिंगपुरा येथील घटना
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
सविस्तर माहिती अशी की,
मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला नागेश लहानपणापासून तो औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा येथील पेठेनगर भाहगात रहात होता. त्याचे एम. ए. पर्यंत शिक्षण झालेले होते.
मंगळवारी रात्री मुंबईला कामानिमित्त गेलेल्या त्याच्या आत्या औरंगाबाद मधील रेल्वे स्टेशनवर आल्यावर त्यांनी नागेशला घेण्यासाठी ये, असा फोन केला. मात्र मी थकलो आहे, असे नागेशने त्यांना सांगितले. त्यामुळे आत्या नातेवाईकांच्या घरी झोपल्या.
त्यानंतर त्याने रात्री ३ वाजता व्हॉट्सअपचे स्टेटस बदलले व त्यात सूसाईड गुडबाय असे लिहिले. तसेच हा मेसेज त्याने मावस भावालादेखील केला. त्यानंतर घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली.
पहाटे झोपेतून उठल्यावर मावस भावाने त्याचा मॅसेज पाहिला व आत्याला याबाबत कल्पना दिली. आत्याने तातडीने घर गाठले तेव्हा आत नागेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.