दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी :- महेंद्र ढिवरे
उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर यांनी दि.20/10/2021 रोजी आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे RTPCR टेस्ट शिक्षक व विद्यार्थ्यांची घेण्यात आली तसेच डॉ एस.व्ही.नेरकर यांनी कोव्हीड19 व साथी आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी विध्यार्थी व शिक्षकांनी कशी काळजी घ्यावी यांवर मार्गदर्शन केले राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना याबद्दल जाणीव जागृतीचे विशेष मार्गदर्शन केले. डॉ रश्मी आर.कामडे, श्री. भरत बी.वाल्हे, श्रीमती सविता पावरा यांनी विध्यार्थी व शिक्षकांची RTPCR टेस्ट घेतली.यासाठी प्राचार्य श्री.आर एफ शिरसाठ यांनी विध्यार्थ्यांना RTPCR टेस्ट ची माहिती दिली,पर्यवेक्षक श्री पी व्ही पाटील व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री एन वाय बोरसे यांनी संयोजन केले.यावेळी श्री एस एम पाटील ,श्री एन डी चव्हाण, श्री एस आर देसले, श्री पी टी चौधरी, श्री सुनिल पाटील, श्री व्ही डी पाटील यांचे सहकार्य लाभले, आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री एन वाय बोरसे यांनी आभार मानले.