
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
९७.८० टक्के गुण घेऊन श्रद्धा नाईक या विद्यार्थिनीने आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडून काढले
शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये लातूर बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, बारुळ या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून कु. श्रद्धा संजय नाईक या विद्यार्थिनीने ९७.८०% गुण घेऊन सर्वप्रथम आली आहे. अंजली गणेश इंगळे ही विद्यार्थी द्वितीय आली. गौरी नारायण गायकवाड या विद्यार्थिनीने ९६ टक्के घेऊन तिसरा क्रमांक पटकावला आहे. परीक्षा केंद्रावर एकूण ९६ विद्यार्थी परीक्षा दिली. त्यामध्ये विशेष प्राविण्यासह ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच प्रथम श्रेणीत २० उत्तीर्ण झाले. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण फक्त एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.एकूण शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
कु. श्रद्धा संजय नाईक या विद्यार्थिनीने मराठीविषयात १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले, कु. खांदाजे आरती दत्ता व कु. इंगळे अंजली रमेश या विद्यार्थिनींनी हिंदी विषयात १०० पैकी ९६ गुण प्राप्त केले, कु. गौरी नारायण गायकवाड या विद्यार्थिनीने इंग्रजी विषयात १०० पैकी ९४ गुण प्राप्त केले, कु. श्रद्धा संजय नाईक गणित विषयात १०० पैकी ९७ गुण प्राप्त केले, कु. इंगळे अंजली रमेश या विद्यार्थिनीने विज्ञान विषयात १०० पैकी ९८ गुण प्राप्त केले असून, कु. श्रद्धा संजय नाईक व कु. गायकवाड गौरी नारायण यांनी सामाजिक शास्त्रात १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले आहेत.
विशेश बाब यात एकूण विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला चित्रकला परीक्षेचे वाढीव गुण प्राप्त झाले आहेत. निकालाच्या या उत्तुंग भरारी बद्दल श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व संचालक भाई डॉ. केशवरावजी धोंडगे (माजी आमदार व खासदार ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी)
संस्थेचे अध्यक्ष भाई डॉ. पुरुषोत्तम धोंडगे माजी जि.प.सदस्य,नांदेड, संस्थेचे सचिव भाई गुरुनाथरावजी कुरुडे (माजी आमदार व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी),सहसचिव ॲड. मुक्तेश्वररावजी धोंडगे, तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष के. डी. पानपट्टे उपाध्यक्ष संजय पाटील जाधव श व मुख्याध्यापक वट्टमवार ए. बी . यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व सर्व विषय शिक्षकांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे आणि सर्व गुणवंतांना भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.