
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी
येथील तलाठी सज्जा अंतर्गत अतनूर, गव्हाण, मेवापूर, मरसांगवी येथे लाभार्थ्यांची गैरसोय व पायपीठ होऊ नये म्हणून विशेष सहाय्य योजने अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन, विधवा, दिव्यांग,अंतर्भूत पीडित आजारी सह अन्य योजनेची सामाजिक सर्व्हेशन अंतर्गत, आर्थिक परिस्थिती, शासकीय नौकरी, घरोघरी जायमोक्यावर जावून स्थळपाहणी, गृहचौकशी नंतरच ग्रामपंचायत कार्यालयात व घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
विशेष सहाय्य योजने अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन सह अन्य विविध योजनेतील लाभार्थ्यांना २१ हजार रूपयाचे प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे तहसिल कार्यालयाने गावागावातून लाभार्थ्यांची चौकशी करून प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम राबवत असून याअंतर्गत अतनूर तलाठी सज्जा अंतर्गत अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, मरसांगवी या गावात अधिकाऱ्यांनी भेट देऊन चौकशी करत प्रमाणपत्र वितरण केले. तहसीलचे मंडळअधिकारी व्ही.एस.सुर्यवाड, अव्वल कारकुन, तलाठी अतिक शेख, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, पोलीस पाटील प्रकाश पाटील, गव्हाणचे सरपंच बालाजी गुडसुरे, पोलीस पाटील रावसाहेब पाटील, दलितमित्र तथा पत्रकार बी.जी.शिंदे, पत्रकार संजय शिंदे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी गव्हाणे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते बंदुसाब मुंजेवार, बंदुसाब शेख, ग्रामपंचायत कर्मचारी गुंडू बोडेवार, मेवापूर, चिंचोली, मरसांगवी गावचे पोलीस पाटील, सरपंच उपस्थित होते.