
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
शेंबा बु: दि.२०. नांदुरा -मोताळा रोडवर शेंबा बु. गाव आहे.येथूनच १९६ नंबरचा राज्य महामार्ग असून दोन्ही तालुक्या च्या हायवेला रस्ता जोडतो. राज्य महामार्ग म्हटले म्हणजे रहदारी वाढलीच.राज्य महामार्ग असल्यामुळे त्याचप्रमाणे रुंदीकरण लागणारच.सदर शेंबा बु, येथे रोडचे काम चालू असून रोडच्या दोन्ही बाजूला नाली बांधकाम सुरू आहे. (मोजमाप मीटर मध्ये)नालीची आतली बाजू रोडच्या सेंटर पासून ९.६०, रोडच्या सेंटर पासून नाली ची बाहेरची बाजू १०.८०,.परंतु काही ठिकाणी नालीचे बांधकाम मोजमापापेक्षा कमी आहे. याचा अर्थ नालीचे बांधकाम रोडच्या आत मध्ये आहे. शेंबा बस स्टॉपवरच नालीचे बांधकाम चालू असून नालीचे बांधकाम करत असताना लाईन मध्ये न करता रोड अरुंद करण्यात आला आहे ? सदर बांधकाम विभागाला रोड कमी करायचा होता तर सामान्य दुकानदारांची दुकाने का हटवली?मग त्या ठिकाणी नाली बांधकाम कमी झाले नसते का? असा प्रश्न सामान्य दुकानदाराकडून उपस्थित होत आहे. शेंबा बू, गणपती मंदिराजवळील नालीचे बांधकाम बघितले असता बांधकाम वळवून रोड अरुंद करण्याचे प्रयत्न सदर कॉन्टॅक्टर कडुन होत आहे. सदर नालीचे बांधकाम वळविले असता कॉन्टॅक्टर कुठे तरी गौड बंगाल तर करीत नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे? यावरून गणपती मंदिराजवळील बांधकाम किती सुमार दर्जाचे काम चालू आहे. याची कल्पना येते. सार्वजनिक बांधकाम विभाग,तथा वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन दखल घेतील का? प्रशासन रस्ता रुंदीकरना वर भर देत असून गल्ली ते दिल्ली पर्यंत रस्ते वाहतूक व्यवस्था सक्षमीकरण चालू आहे. आणि बांधकाम विभागाचे धोरण म्हटले तर नाली बांधकाम चालू असताना रस्ता कसा अरुंद करता येईल यावर जास्त भर आहे? असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.