
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:जिल्ह्यात मागच्या काहि महिन्यापासून सर्रासपणे विवाहितेला मारहाण, हुंड्यासाठी छळ, किरकोळ कारणावर वाद अशा घटनांत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान एका २० वर्षीय विवाहितेला केवळ दहा हजार रूपयासाठी सासरच्यांनी रॉकेल टाकून जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना देगलूर तालूक्यातील चैनपुर येथे घडली़ या प्रकरणी सदर महिलेचा पती व आजी सासूविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देगलुर तालूक्यातील चैनपुर येथील एका विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. चैनपूर येथील ज्योति शिवकूमार ममताबादे (२०) यांनी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांच्यां सासरच्या लोकांनी नेहमी पैशासाठी तिचा छळ केला.
माहेरहून दहा हजार रूपये घेवून ये असा तगादा लावत पती शिवकूमार माधव ममताबादे व आजी सासू हनमाबाई हवगीराव ममताबादे या दोघांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला़ एवढेच नाही तर त्या दोघांनीही दहा हजार रूपयासाठी तिला थापड बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत सदर विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून आगपेटीने पेटवून खून करण्याचा प्रयत्न केला.
मात्र प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला, अशी तक्रार दिली आहे़ या प्रकरणी ज्योति शिवकुमार ममताबादे यांच्या तक्रारीवरून देगलूर पोलिस ठाण्यात पती शिवकुमार माधव ममताबादे व आजी सासू हनमाबाई हवगीराव ममताबादे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोउपनि पुनम सुर्यवंशी ह्या अधिक तपास करीत आहेत.दरम्यान शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात झाला असला तरी लोकांची मानसिकता बदलण्याचे नाव नाही़ जसी मानवाने विविध क्षेत्रात प्रगती साधली तशी आपली जूनी मानसिकता आणि विचार सोडाचे तो नाव घेत नाही़ हुंडाबळी कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही़ त्यामुळे अशा घटना सर्रासपणे घडताना दिसत आहेत.