
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलडाणा, दि.२१.
योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. सृदढ व निरोगी जिवनासाठी योग हा उत्तम व्यायाम असून मनुष्याने नियमित योगभ्यास केला पाहिजे. असे आवाहन जिल्हाधिकारी एस.राममुर्ती यांनी केले. जिल्हा प्रशासन बुलडाणा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा, शालेय शिक्षण विभाग (माध्यमिक प्राथमिक), नेहरु युवा केंद्र बुलडाणा जिल्हा योग संघटना, क्रीडा भारती, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, योग विद्याधाम बुलडाणा, योगांजली योग वर्ग, पतंजली योग समिती, एकविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, ए.एस.पी.एम.महाविद्यालय, आयुर्वेद नर्सिंग महाविद्यालये यांचे संयुक्त विद्यमाने जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, तर प्रमुख अतिथी जिपा अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, शिक्षणाधिकारी (माध्यमिक).प्रकाश मुकुंद, क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी यावेळी उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशीष पवार,समाधान वाघ, डॉ.राजेश्वर उबरहंडे, ब्रिगेडीयर वानखडे, सुनिल पाटील, सुभाष आठवले, श्रीमती मनिषा ढोके, संजीवनी शेळके,एस.एन.जवंजाळ, भारत विद्यालय, एडेड हायस्कुल, प्रबोधन हायस्कुल, शारदा ज्ञानपीठ, ए.एस.पी.एम.आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, शिवासाई युनिर्व्हसल, शासकीय नर्सिंग महाविद्यालय, महा सैनिकी प्रशिक्षण केंद्र, पोलीस प्रशिक्षणार्थी, प्रजापीता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय, क्रीडा शिक्षक गिरीश चौधरी, रविंद्र गणेशे,राहुल औशलकर, सय्यद दाऊद, डॉ.शिवशंकर गोरे, सौभागे, मंजेश मुंढे, अरविंद अंबुसकर, विठ्ठल इंगळे, कोलते, प्रा.नंदु गायकवाड, प्रा.डॉ.कैलास पवार, उपस्थित होते.
योगाचे मुख्य प्रात्यक्षीक व संचलन अंजली परांजपे, प्रशांत लहासे, भुषण मोरे, सचिन खाकरे यांनी केले व अच्युतराव उबरहंडे, कुंदा पंधाडे यांनी सहाय्यक प्रात्यक्षीक म्हणून काम केले. या कार्यक्रमाचे नियोजन अनिल इंगळे,अजयसिंग राजपूत, रविंद्र धारपवार,विजय बोदडे,मनोज श्रीवास, विनोद गायकवाड,कैलास डूडवा, भिमराव पवार, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे, गणेश डोंगरदिवे, धनंजय चाफेकर, विलास सोनुने यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन अनिल इंगळे, रविंद्र धारपवार यांनी तर आभार अजयसिंग राजपुत यांनी केले.