
दैनिक चालू वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
(२१ जुन २०२२ पुणे )रोजी जागतिक योग दिवसानिमीत्त
मा.उपमहापौर सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर मित्र परिवार आणि आद्यम योगा संस्थेच्या वतीने नव्याने साकारण्यात आलेल्या तथागत भगवान गौत्तम बुद्ध विपश्यना विहार या ठिकानी योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ठिक ०६:०० वाजता या शिबिरास सुरुवात झाली. प्रभागातील बहुसंख्य नागरिकानी या ठिकानी विविध योगा प्रकार शिकण्याचे प्रात्यक्षिक केले.यावेळी आद्यम योगा संस्थेचे आंतरराष्ट्रीय ख्यातिचे योगाचार्य शंकर खेडकर,तनू पाटणकर,रुपिना शाह,सदाशिव चव्हाण यांनी योग प्रात्यक्षिक करुन मार्गदर्शन केले.यावेळी
मा.उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांच्या वतीने योगाचार्यांचे स्वागत करण्यात आले.शिबिरास रिपाई नेते परशुराम वाडेकर,व रिपाई शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम आदी उपस्थित होते.