
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी -पंकज रामटेके
दि.२४ जून २०२२ शुक्रवार रोजी ला जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर तर्फे घुग्घूस च्या तहसील कार्यालयाला लेटर प्राप्त झाले.
घुग्घूस अमराई वार्ड क्र. 1, उडिया मोहोल्ला, बेघर एरिया आणि समस्त नजुलच्या जागेवर गेली अनेक वर्षांपासून येथील नागरिक राहत आहेत. ते ग्रामपंचायत आणि आता नगरपरिषद ची नियमितपणे घरपट्टी भरत असूनही त्यांना जमिनीचे पट्टे मिळाले नसल्या कारणानं येथील नागरिकांना अनेक प्रकारच्या शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत आहे? तसेच ईतरही ठिकाणी कागदोपत्रीच त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असे. ही बाब लक्षात घेऊन येथील रहिवासी महेंद्र बाग, कांता बाग, वनिता निहाल आणि इतरांनी घुग्घूस च्या नगरपरिषद ला निवेदन सादर केले. परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली गेली नसल्यामुळे त्यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर, मा. पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार साहेब, मा. प्रकाशभाऊ देवतळे, जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमेटी, मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांना निवेदन दिले होते. त्या निवेदन मध्ये संबंधित नागरिकांना नजूलच्या जमिनीचे पट्टे मिळावे या करिता चौकशी करून अहवाल सादर करावा, असे सुचित करण्यात आले आहे. केलेल्या प्रयत्नाला यश येत असल्याबद्दल महेंद्र बाग, कांता बाग, वनिता निहाल यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब तसेच अन्य मान्यवरांचे आभार व्यक्त केले. आणि घुग्घूस च्या नागरिकांना नजूलच्या जमिनीचे लवकरात लवकर पट्टे मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.